Mrs_Congeniality

Wednesday, August 02, 2006

देजा वू

खरं तर मला ब्लॉग वगैरे काही लिहीता येत नाही ...आणि सगळ्यात वर्स्ट थिंग इज मला माझे विचार स्पष्ट पणे मांडता येत नाहीत पण एवढ्या सगळ्यांचे छान छान ब्लॉग वाचून विचार केला की आपणही काहीतरी लिहावं .... :-)

नेहेमीप्रमाणेच काय लिहावं ते कळत नव्ह्तं, म्हणून अगदी छोटीशी सुरुवात करते आहे.

अभिजीत सोफ़्यावर बसलेला.. लॅपटॉप वर काहीतरी करत होता .... माझी शेजारी बसून नेहेमीप्रमाणे असंबद्ध बडबड चाललेली.. आणि मधूनच असं वाटलं की जे काही आत्ता घडलं ते मी या आधी पाहिलं आहे..........

माझ्या बाबतीत असं बऱ्याचदा होतं. काहीतरी मी स्वप्नात बघते, विसरुन जाते.. आणि ते जेव्हा खरं घडत असतं, तेव्हा एकदम आठवतं की आपण हे आधी कुठेतरी पाहिलं आहे.

आणि नंतर कळतं की अरे आपण हे कधितरी "स्वप्नात" पाहिलं होतं. पण ती वेळ येईपर्यंत काहीच लक्षात नाही येत की असं काही आत्ता पुढे घडणार आहे, जे आपल्याला आधीपासून माहीत आहे... बरोब्बर ती वेळ निघून गेली की लक्षात येतं हे आपण पाहिलं होतं...

तुमच्याही बाबतीत कधी असं काही होतं का?